अल्पवयीन मुलीवर ट्युशनच्या शिक्षकाचा बलात्कार, अश्लील व्हिडीओ शूट करून करत होता ब्लॅकमेल

प्रातिनिथिक फोटो

हरयाणामध्ये एका अल्पवयीन मुलीवर ट्युशनच्या शिक्षकानेच बलात्कार केला आहे. इतकेच नाही तर तिचा अश्लील व्हिडीओ शूट करून तिला तो ब्लॅकमेलही करत होता.

हरयाणाच्या हिसारमध्ये एक मुलगी गावात ट्युशनमध्ये जात होती. एके दिवशी शिक्षकाने रस्त्यात अडवून तिची छेड काढली. तेव्हा मुलीने तिथून पळ काढला. नंतर ट्युशनमध्ये शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा अश्लील व्हिडीओही काढला. या व्हिडीओची धमकी देत शिक्षकाने तिच्याकडून पैसे उकळले. ही गोष्ट जर घरी कळाली तर आपले शिक्षण बंद होईल अशी भिती पीडित मुलीला होती. म्हणून तिने याबाबत कुठेच वाच्यता केली नाही. ती शिक्षकाला गुपचुप पैसे देत होती. अशा प्रकारे तिने शिक्षकाला 50 हजार रुपये दिले होते. एकदा घरातील बॅगेतून पैसे चोरताना पीडित मुलीच्या आईने तिला पाहिले तेव्हा मुलीने सर्व हकीगत सांगितली. तेव्हा कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या