ट्विटरचा चिवचिवाट बंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरची सेवा शुक्रवारी रात्री ठप्प झाली होती. त्याचा फटका जवळजवळ 40 हजार युजर्सना बसला. यानंतर कंपनीने आज, 17 एप्रिल रोजी पहाटे 6 वाजून 21 मिनिटांनी याबाबत ट्विट केले की, काही युजर्सचे ट्विट्स लोड होत नाहीत. आम्ही या समस्येवर काम करत आहोत आणि लवकरच हे दुरुस्त केले जाईल. Downdetector.com च्या मते शुक्रवारी 40 हजार युजर्सनी ट्विट करण्यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.