FIFA World Cup – गोलपोस्टच्या पलीकडचे, जपानचा तो गोल ‘ट्रोल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानच्या आओ तानाकाने मारलेल्या गोलमुळे वाद सुरू झाला आहे. त्याच्या गोलपूर्वी सामन्यात 1-1 अशी बरोबरी होती. मात्र या गोलमुळे 2-1 ने विजय मिळवत जपानने सुपर-16 मध्ये एण्ट्री मारली. पहिल्या डावात स्पेनकडे 1-0 अशी आघाडी होती, मात्र दुसऱ्या डावात रित्सू डोआनने गोल मारत बरोबरी साधली. त्यानंतर 51 व्या मिनिटाला तानाकाने मितोमाच्या मदतीने गोल मारला. मात्र हा गोल वादात अडकल्याने रिह्यू घेण्यात आला. यात जपानच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयाने जर्मनीचे फुटबॉल वर्ल्ड कपमधील स्वप्न भंगले आहे, मात्र नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

पराभवाचा आनंद जीवावर बेतला

इराणचा संघ पराभूत झाला आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले. मात्र स्वतःच्या संघाच्या पराभवाचा आनंद साजरा करण्याचे कृत्य इराणच्या एका नागरिकाने केल्याने सर्वांना धक्का बसला. सुरक्षा रक्षकांनी त्याला गोळय़ा घालून ठार मारले. या नागरिकाचे हे कृत्य देशद्रोही आहे, असे समजून सुरक्षा रक्षकांनी त्याला गोळय़ा झाडल्या. मेहरान समक असे या व्यक्तीचे नाव असून तो 27 वर्षांचा होता.