मामाच्या मुलीवरून भावांचे भांडण, डोक्यात फोडली बाटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरातील सिद्धार्थनगर भागात लग्न झालेल्या मोठ्या भावाने मामाच्या मुलीसोबत दुसरे लग्न करण्याचा हट्ट केल्याने समजावून सांगण्यास गेलेल्या लहान भावाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्यास जखमी केले. याप्रकरणी गणेश राजु कांबळे (सिध्दार्थनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सिद्धार्थनगर येथील पंचल शाळेजवळ राहणारा बाळू राजु कांबळे (वय 26) याचा भाऊ गणेश कांबळे याचे काही दिवसांपूर्वी लग्न झालेले आहे. असे असताना गणेश हा मामाच्या मुलीसोबत दुसरे लग्न करण्याची धमकी देतो. बाळू हा गणेशला म्हणाला की, ‘तुझे लग्न झालेले आहे. तू मामाच्या मुलीला का फितवतो मला तिच्याबरोबर लग्न करायचे आहे’ असे समजावून सांगताना गणेशला राग येवून त्याने बाळू याला शिवीगाळ करून काचेची बाटली बाळू याच्या डोक्यात फोडली. त्यानंतर ‘मला मामाच्या मुलीसोबत दुसरे लग्न करायचे आहे’ अशी धमकी गणेश याने दिली. यावरून बाळू कांबळे याने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश कांबळे याच्याविरूद्ध विविध कलमान्वये तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.