बढती मिळाल्याचा आनंद साजरा करायला निघाले, भीषण अपघातात डॉक्टर व इंजिनिअर मित्राने प्राण गमावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये कामाच्या ठिकाणी बढती मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. वेगवान कार अनियंत्रित होऊन झाडाला धडकली आणि त्यानंतर पलटी झाली. या अपघातात दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विकास मौर्य आणि अजय कुमार अशी मृत मित्रांची नावे आहेत. विजय मौर्य हे लखनौ मेट्रोमध्ये इंजिनिअर पदावर, तर अजय कुमार हे डॉक्टर होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बाकराबाद येथील राहणारे विकास कुमार मौर्य लखनौ मेट्रोमध्ये इंजिनिअर पदावर कार्यरत होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना बढती मिळाली होती. याचा आनंद साजरा करण्यासाठी ते अजय कुमार, अमित गुप्तासह वॅगनार कारमध्ये चारबाग येथे फिरायला गेले होते.

अमित गुप्ता कार चालवत होता. रात्री एकच्या दरम्यान कारचे ब्रेक फेल झाले आणि कार अनियंत्रित होऊन झाडाला धडकली. त्यानंतर पलटी झाली. यात विकास आणि अजय यांचा मृत्यू झाला. विकासच्या लग्नाची बोलणी सुरू होती, तर अजयला दीड वर्षांचा मुलगा असून पत्नी गर्भवती आहे. या दोघांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.