
जर्मनीत खासगी छोटे प्रवासी विमान घरावर कोसळल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत दोघेही ब्रेमेन शहरातील रहिवासी होते. अपघात कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ओल्डेनबर्ग शहराजवळील गँडरकेसी येथील निवासी भागात हा अपघात घडला. एका घराच्या छतावर हे विमान थेट आदळले. विमानात दोन वयोवृद्ध प्रवासी होते, दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. घटनेनंतर घरातील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर घरातील लोकांना पुन्हा घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. अपघाताबाबत तपास सुरू आहे.



























































