
सामना प्रतिनिधी, लातूर
रोकडा सावरगाव मोडवर भरधाव येणार्या अज्ञात वाहनाने एनसीसी परेडसाठी जाणार्या पुजा भोसले आणि गोविंद दहिफळे नामक विद्यार्थाला जोराची धडक दिल्याने या अपघातात या दोन्ही विद्यार्थांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळी ६:३० दरम्यान एन सी सी परेडसाठी जाणार्या दोन विद्यार्थी रस्त्यालगत पडलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, संतोष रोडगे सर यांना दिसले. तत्काळ शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी पोलीस स्टेशन, शासकीय दवाखान्यासी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. लागलीच अॅम्बुलन्स, पोलीस घटनास्थळी पोचले जागेवरच दोन्ही विद्यार्थांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजले. घटनास्थळी मुलीचे आयकार्ड आसल्याने ओळख पटली, अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

























































