कश्मीरात दोन अतिरेक्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीर खोऱयातील शोपियां येथे लष्कराने हिजबूल मुजाहिदीनच्या दोन अतिरेक्यांचे एन्काऊंटर केले. मोहमंद इद्रिस सुलतान ऊर्फ छोटा अबरार आणि आमीर हुसैन ऊर्फ अबू सोबान अशी या अतिरेक्यांची ओळख पटली असून त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

शोपियां येथे अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ तसेच स्थानिक पोलिसांच्या पथकाने शोधमोहिम सुरू केली. एका घरात दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. लष्करानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या धुमश्चक्रीत मोहमंद इद्रिस सुलतान व आमीर हुसैन हे दोघे ठार झाले. हिजबूल मुजाहिदीनमध्ये त्यांची ओळख छोटा अबरार व अबू सोबान अशी होती. यापैकी इद्रिस हा लष्करात जवान होता. एप्रिलमध्ये तो लष्करातून पळून गेला आणि हिजबूल मुजाहिदीनमध्ये सामील झाला. खोऱयातील अनेक घातपाती कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. लष्कराने घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.