
सामना ऑनलाईन । मुंबई
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात खेळल्याने कुर्ल्यातील प्राचीन काळे या १४वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पुन्हा एका २५ वर्षीय तरुणाचा लेप्टोने बळी घेतला आहे. शीव रुग्णालयात या तरुणाचा मृत्यू झाला असून यामुळे लेप्टोच्या बळींची संख्या दोनवर पोहोचली आहे.
कुर्ल्यातील मिलिंदनगर येथे राहणाऱ्या प्राचीन काळे यास ताप येत असल्याने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला अंगदुखी, उलटय़ादेखील सुरू होत्या. रात्री त्याला रक्ताची उलटी झाली व त्याची प्रकृती अधिकच बिघडली. सोमवारी सकाळी ११ वाजता त्याचे निधन झाले. साथीच्या आजाराने मृत्यू झाला असला तरीही कैद्यकीय अहकाल तपासूनच याकर बोलणे उचित ठरेल, असे एका पालिकेच्या आरोग्य किभागाच्या अधिकाऱयाने सांगितले. त्याच प्रमाणे एका २५ वर्षीय तरुणाला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्याची प्राणज्योत मालवली.
पावसाच्या साचलेल्या पाण्यात प्राण्यांची विष्ठा मिसळते. अंगावरची जखम उघडी असेल तर लेप्टोचा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिस या आाजाराचा प्रसार होतो.



























































