शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका करणे योग्य नाही – उदयनराजे भोसले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
udayan-raje-bhosle-babasaheb

सामना प्रतिनिधी । पुणे

‘छत्रपती शिवाजी महाराजांविषयी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मोठे काम आहे. त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही’ असे मत व्यक्त करतानाच ‘जेम्स लेनला शिक्षा झाली पाहिजे’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली.

कात्रज-आंबेगाव परिसरात होत असलेल्या शिवसृष्टीची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, ‘बाबासाहेबांवर टीका करणे योग्य नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मोठे काम केले आहे. सध्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात शिवसृष्टीचे काम सुरू आहे. या शिवसृष्टीला सरकार मदत करीत आहे, पण सर्वांनी या शिवसृष्टीला हातभार लावायला हवा.’

‘अरबी समुद्रामध्ये राज्य सरकार बांधत असलेल्या शिवरायांच्या स्मारकाचे काम कुठपर्यंत आलेय ते मला माहीत नाही पण शिवस्मारक झाले पाहिजे’ असे त्यांनी स्पष्ट केले.