
पाटणा येथील न्यायालयाच्या परिसरात शुक्रवारी एका अंडरट्रायल कैद्याची दोन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अनेक खटल्यांमध्ये खुनाच्या आरोपात अटकेत असेलला अभिषेक कुमार उर्फ छोटे सरकार याला आज दानापूर न्यायालयात नेण्यात आले. यावेळी दोघांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला ज्यामध्ये कैद्याला गोळी लागली, असे पाटणा पश्चिमचे एसपी राजेश कुमार यांनी सांगितले.
परिसरातून चार गोळ्या जप्त करण्यात आल्या असून न्यायालय परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिला आहे. तसेच हे आरोपी मुझफ्फरपूरचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

























































