पोलिसाकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे एका सात वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करताना पोलीस कर्मचाऱ्याला मुलाच्या पालकांनी रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे. के पी सिंह असे त्याचे नाव आहे.

आरोपी पोलीस पोलिसांच्या 100 क्रमांक या हेल्पलाईन विभागात काम करतो. मंगळवारी दुपारी मुलगा घरात एकटा असल्याचे बघून आरोपीने त्याला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्याने त्याला मारझोड करत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान पोलीस मुलावर अत्याचार करत असतानाच त्याचे आई वडील त्याला शोधत पोलिसाच्या घरात शिरले. त्यावेळी समोरचा प्रसंग पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यांनी ताबडतोब पोलिसाच्या तावडीतून मुलाची सुटका केली. यादरम्यान पोलिसाने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत तिथून पळ काढला.

मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेबद्दल कळताच संपूर्ण गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपी पोलिसावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पीडित मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.