
नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोपावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माजी स्वीय सहाय्यकाची धुलाई करण्यात आली आहे. माजी स्वीय सहाय्यक अजय धवणे यांना एक इसम लाथा बुक्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. मारहाण करत असलेल्या पीडित व्यक्तीकडून नोकरी लावून देण्याच्या नावाखाली धावणे यांनी 13 लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. धवणे नोकरीच्या नावावर एक लाखांपासून तीस लाखांपर्यंत पैसे उकळतो अशा चर्चा सुरू आहेत. मुनगंटीवार यांनी धवणे यांना कामावरून काढले असल्याचं बोलले जात आहे.
View this post on Instagram

































































