उरण- नौदल परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

387
प्रातिनिधिक फोटो

नौदल परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. येथील नौदलाच्या शस्त्रसाठा असलेल्या परिसरात असलेल्या जेट्टीजवळ गस्ती दरम्यान सुरक्षा जवानांना बिबट्या दृष्टीत पडला. त्यामुळे नागरिकांना सावधगिरीच्या सुचना नौदल विभागाचे डेप्युटी जनरल एस.के.शर्मा यांनी दिली आहे.

उरण येथे नौदलाचा शस्त्रागार आहे.या शस्त्रागारालगतच मोठा डोंगराला भाग आहे. 5 ते 7 मार्च दरम्यान घसरत घालीत असताना सुरक्षा जवानांना बिबट्या दृष्टीत पडला. ही बाब त्यांनी तत्काळ वरिष्ठांच्या कानावर घातली. नौदलाच्या अधिकाऱ्यांनीही गंभीरतेने दखल घेत परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगावी अशा लेखी सुचना नौदल विभागाचे डेप्युटी जनरल एस.के.शर्मा यांनी केल्या आहेत. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. नौदल परिसरात आयएनएस तुनीर आणि आयएनएस अभिमन्यू अशा दोन कामगार वसाहती आहेत. या वसाहतीमध्ये शेकडो नौदल कामगार आणि अधिकारी आपल्या कुटुंबियांसह राहतात. तर नौदलाच्या संरक्षक भिंती लगतच मोरा, हनुमान कोळीवाडा, भवरा, बोरी-पाखाडी, केगाव आदी गावे वसली आहेत. या नागरी वस्तीत हजारो कुटुंबे वास्तव्य करून आहेत. बिबट्याच्या वावरावे या परिसरातील नागरिकांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या