Video – लव्ह जिहाद करणाऱ्यांचे राम नाम सत्य होईल; योगी आदित्यनाथ यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील लव्ह जिहाद प्रकरणांबाबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘अशी प्रकरणे थांबवण्यासाठी आम्ही काम करत असून लवकरच लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करणार आहोत. तसेच महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल’, असा इशाराही योगी यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी धर्म बदलण्याची आवश्यकता नाही.’ अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्म परिवर्तन संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, केवळ लग्नासाठी धर्म परिवर्तन करणे आवश्यक नाही.