लव्ह जिहाद! नाव बदलून तरुणीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर केला बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रेटर नोएडामध्ये एक लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. एका मुस्लीम तरुणाने त्याची खरी ओळक लपवून एका हिंदू मुलीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्या तरुणाने लग्नाच्या आणाभाका देत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापिक केले. मात्र जेव्हा लग्न करायची वेळ आली त्यावेळी त्याने त्याचे खरे नाव सांगत तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला. ते सर्व ऐकून तरुणीला धक्का बसला. तिने तत्काळ या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे.

सदर 20 वर्षीय तरुणी एका कंपनीत कामाला आहे. त्याच कंपनीत दुसऱ्या विभागात एक तरुण कामाला होता. त्याने त्याचे नाव सोनू राठोड असल्याचे तिला सांगितलं होतं व तो मूळचा उत्तर प्रदेशमधील बंदायूँ गावचा असल्याचे सांगितलेले. काही दिवसातच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तरुणाने तरुणीला लग्नाचे वचन देखील दिले होते. या दिवसात ते एकमेकाच्या जवळ देखील आले.

मात्र जेव्हा मुलीने लग्नाचा तगादा लावला मुलाने त्याची खरी ओळख त्याला सांगितली व तिला धर्म परिवर्तन करण्यास सांगितले. जेव्हा त्या मुलीला सत्यपरिस्थिती कळली तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिने याप्रकरणी तरुणाविरोधात लव्ह जिहाद व बलात्काराची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सोनू उर्फ फरजान याला अटक केली असून तो मूळचा उत्तरप्रदेशमधील बिजनौरचा रहिवासी आहे. तो कामानिमित्त स्ध्या दिल्लीत स्थायिक झालेला.