धक्कादायक; तरुणाने जीभ कापून देवीला केली अर्पण..

murder-knife

उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील भाटी गावात एका तरुणाने आपली जीभ कापून देवीला अर्पण केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटी गावातील आत्माराम (वय 32) नावाच्या या तरुणाने शनिवारी सकाळी मंदिरात पूजा केल्यानंतर आपली जीभ कापून देवीला अर्पण केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

तरुणाच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मानसिकदृष्ट्या आजारी असून तो नवरात्रीत नऊ दिवस उपवास करत होता. तरुणाच्या वडिलांनी दावा केला आहे की, आपल्या मुलाची कोणीतरी दिशाभूल केली आहे, म्हणून त्याने आपली जीभ कापून घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या