उत्तराखंडमध्ये पर्यटकांच्या गाडीला अपघात; 9 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंड येथील रामनगरमध्ये पहाटे 5.45 वाजता पर्यटकांची गाडी ढेला नदीवरील पुलावरून कोसळली. पाण्याचा प्रचंड वेग आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पाण्यात पलटी झाली. या अपघातात 9 जण ठार झाले आहेत.

बचावकार्यात नाजिया नावाची एक मुलगी आणि एका लहान बालकाला वाचविण्यात यश आले आहे. दोघांनाही राम नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हे एका रिसॉर्टमध्ये उतरले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण ऑर्केस्ट्रामध्ये काम करीत होते. ते एका कार्यक्रमातून रिसॉर्टमध्ये परत येताना हा अपघात झाला.