
शिवसेना नेते-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार ‘वरळीज गॉट टॅलेंट’चा पहिला सीजन नुकताच महालक्ष्मी येथील लाला लजपतराय ऑडिटोरियममध्ये दिमाखात पार पडला. या स्पर्धेत ‘डान्स विथ हुला हुप्स’ आर्टिस्ट वैष्णवी मोरे हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. रोख रक्कम एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘वरळीज गॉट टॅलेंट’ला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस साईच्छा भजन मंडळ (सिंगिंग बॅण्ड) यांनी पटकावले. रोख रक्कम तीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तिसऱया क्रमांकाचे बक्षीस वर्सटाईल एडुकेअर सिस्टम (रुबिक्स क्युब) आणि जय हनुमान कलामंच (ग्रुप डान्स) यांना विभागून देण्यात आला. 20 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिवसेना उपनेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते सचिन अहिर, विभागप्रमुख-माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त चिटणीस संजय कदम, चिटणीस नीलेश (अप्पा) पराडकर, शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष सुशांत शेलार, वरळी विधानसभा संघटक अनुपमा परब, माजी नगरसेवक संतोष खरात, स्नेहल आंबेकर, अनिता नायर, दत्ता नरवणकर, कल्पना सुर्वे, शाखाप्रमुख विजय भणगे, जिवबा केसरकर, दत्ता कोळी, सुजाता सावंत, चंद्रकांत खोपडे, सत्यम नायर, विशाल गुप्ता आदी उपस्थित होते.
-‘वरळीज गॉट टॅलेंट’मध्ये जवळपास 500 स्पर्धकांनी आपली कला सादर केली. त्यातून अंतिम फेरीसाठी 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. अभिनेता संतोष जुवेकर, सुयश टिळक आणि अभिनेत्री गौरी नलावडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेची संकल्पना आणि नियोजन अमोल परब आणि राजेश लाड यांनी केले.



























































