
जगभरात गुलाबाचे फूल प्रसिद्ध आहे. प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या या फुलाचे लाल, गुलाबी, पांढरा, पिवळा, हिरवा, निळा अशा तऱ्हेतऱ्हेचे रंग बाजारात दिसतात. गुलाबाच्या पानांचाही औषधी गुणधर्मासाठी उपयोग केला जातो. गुलाबाच्या फुलातही अनेक औषधी गुणधर्म असतात. सजावट, खाद्यपदार्थ, अत्तर तयार करण्याकरिता अशा विविध ठिकाणी गुलाब वापरले जाते. या फुलांमध्ये जीवनसत्त्व ‘सी’ मुबलक प्रमाणात असते. गुलाबापासूून तयार होणारे गुलाबपाणी सौंदर्य प्रसाधने आणि औषधांसाठी वापरले जाते. सगळ्यांना प्रिय असणाऱ्या गुलाबाच्या फुलाचे अनेक चमत्कारिक उपाय आहेत. जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी फक्त एक गुलाबाचे फूल कसे उपयोगी पडू शकते, हे वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया.
– सुख-समृद्धीत वाढ होण्याकरिता लक्ष्मीदेवीच्या चरणी गुलाबाचे फूल अर्पण करून प्रार्थना करा.
– लाल गुलाबाचे झाड लावल्यास घरातील सकारात्मकता वाढते. याशिवाय घरातील सकारात्मक ऊर्जाही वाढायला मदत होते.
– घरात वास्तूशी निगडीत त्रास होत असतील, तर घराच्या परसात पांढऱ्या गुलाबाचे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे वास्तूसाठी शुभकारक असते.
– मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणत्याही शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी ताजी 11 गुलाबाची फुले हनुमानाच्या मूर्तीवर वाहावीत. सलग 11 मंगळवार असे केल्याने मनोकामना पूर्ण होते.
– धनप्राप्तीकरिता एखाद्या सायंकाळी गुलाबाच्या फुलात कापराचा तुकडा ठेवून जाळावा. कापूर जाळल्यानंतर ते फूल देवीला वाहावे.
– मंगळवारी लाल चंदन, लाल गुलाब आणि लाल दोरा कापडात बांधून घ्यावा. ही पोटली एक आठवडा देवघरात ठेवावी. त्यानंतर घरातील किंवा दुकानातील तिजोरीत ठेवावी. या उपायाने पैसा टिकून राहील.
– घरातील लहान मूलं सतत आजारी पडत असतील तर एका खायच्या पानावर बुंदीचा लाडू, 5 गुलाबीची फुले ठेवून मुलावरून सात वेळा ओवाळून एखाद्या मंदिरात ठेवावे.
– मंगळवारी सुरुवात करून असे 40 दिवस दररोज सकाळी अनवाणी मारुतीच्या मंदिरात जाऊन गुलाबाचे फूल वाहावे. हा उपाय नोकरीसाठी केला जातो.
– एखादे कार्य पूर्ण होण्यात अडथळे येत असल्यास पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर 3 गुलाब, 3 बेल किंवा जाईचे फूल नदीत विसर्जित करावे. सलग 5 पौर्णिमा असे केल्याने कार्यातील अडथळे दूर होतात.




























































