
अमेरीकेत एक विचित्र घटना घडली आहे. चोरट्यांना घरात काहीच न सापडल्याने संतापलेल्या चोरट्यांनी त्या घरातील 79 वर्षाची व्यक्तीला पकडले. त्या व्यक्तीसोबत त्यांनी असे काही केले की त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागले.
अमेरीकेतील व्हेनेझुएला या शहरात ही घटना घडली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार एका व्यक्तीच्या घरात तीन चोरटे घुसले आणि त्यांनी चोरी करण्यासाठी अख्ख घर पालथं घातलं. मात्र त्यात त्यांना काहीच मौल्यवान किंमतीचे सापडले नाही. घरात चोरण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या मात्र त्या खूप मौल्यवान नव्हत्या. त्यावेळी घरात एक वृद्ध इसम होते.
संतापलेल्या चोरट्यांनी 79 वर्षांच्या वृद्धाच्या गुप्तांगात बीयरची बाटली घुसवली आणि त्यांनी पोबारा केला. त्यानंतर जखमी झालेल्या वृद्धाने घरातल्या व्यक्तीला फोन करुन कळवले. घरचे परतल्यावर त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी जेव्हा एक्सरे केला तेव्हा हादरले. बियरची पूर्ण बाटली त्या वृद्ध व्यक्तीच्या गुप्तांगात टाकली होती. त्यानंतर डॉक्टरांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करु ती बाटली काढून टाकण्यात आली. ही शस्त्रक्रिया सोपी नव्हती यात डॉक्टरांना खूप वेळ लागला. आता त्यांची तब्येतीत सुधार होत आहे. मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही ही बियरची बाटली चोरट्यांना कुठून मिळाली ते.
























































