
पुण्यातील बारामती ऍग्रो कंपनीविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) बजावलेली नोटीस कायद्याला धरून आहे की बेकायदेशीर, याबाबत उच्च न्यायालय गुरुवारी निर्णय देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे बारामती ऍग्रोचे संचालक आहेत. कंपनीच्या याचिकेवर सोमवारी दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाले. त्यानंतर कंपनीला याआधी दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवत न्यायालयाने निकाल राखून ठेवला.


























































