ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ख्यातनाम समाजसेवी डॉ. प्रकाश आमटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात ते एका विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी आले होते. तेथे त्यांना तीव्र ताप आणि खोकला जाणवू लागल्याने तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्या विविध तपासण्या सुरू असून पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरी निरीक्षणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. डॉ. प्रकाश आणि आमटे कुटुंबीयांशी सध्या संपर्क साधू नये, असे करण्यात आवाहन करण्यात येत आहे.