
मोहम्मद पैगंबरांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी हिंदुस्थानसह संपूर्ण जगभरात पडसाद उमटत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन सूचक आणि अर्थपूर्ण असल्याचे मत माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केले आहे.
हिंदुस्थानात होणाऱया अनेक धर्मसंसदांमध्ये मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत, अल्पसंख्याकांविरोधी, मुस्लिमविरोधी भाषणे केली जात आहेत हे योग्य नाही. यामुळे देशाच्या शांततेला बाधा पोहचू शकते असेही हमीद अन्सारी यांनी स्पष्ट केले. मात्र याबाबत सरकार अवाक्षरिही काढत नाही ही चिंतेची बाब असल्याचे अन्सारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. तसेच सध्या जे काही सुरू आहे ते अचानक सुरू झालेले नाही, तर ते नियोजनबद्धरितीने सुरू असून सरकार ते सहन करत आहे. हे एक त्यांचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री गप्प का आहेत? त्यांनी बोलावे अशी जनतेची इच्छा असल्याचेही अन्सारी म्हणाले.

























































