
सामना ऑनलाईन । मुंबई
देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक असलेले मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी हा आज श्लोका मेहता हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. या लग्नसोहळ्याला देशविदेशातून पाहुणे आले होते. लग्नासाठी नवरदेव बनून निघालेल्या आकाशच्या वरातीत संपूर्ण अंबानी कुटुंब थिरकताना दिसले. आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नात बिलेनियर मुकेश अंबांनीना देखील नाचण्याचा मोह आवरला नाही.
आकाशच्या वरातीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात आकाश स्वत: देखील बेभान होऊन नाचताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचे वडिल मुकेश अंबानी, आई नीता अंबानी, बहिण इशा अंबानी देखील नाचत आहेत. त्या व्यतिरिक्त बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आमीर खान, रणबीर कपूर, सिद्धार्थ कपूर चित्रपट निर्माता करण जोहर नाचताना या व्हिडीओत दिसत आहेत.




























































