राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत विघ्नेशला रौप्य, भूपेशला कांस्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विघ्नेश मूरकर व भूपेश वैती या दोघांनी गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. विघ्नेश मूरकर याने क्रिएटिव्ह फॉर्म प्रकारामध्ये रौप्य पदकाला तर भूपेश वैती याने पॉइंट फाइट प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली.

गोवा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संपुलात वाको इंडिया नॅशनल किक बॉक्सिंग सीनियर अॅण्ड मास्टर्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. स्पोर्टस् मुंबई किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरकडून उमेश मूरकर यांनी प्रशिक्षकांची भूमिका पार पाडली.

रोशन शेट्टी, लॉबिंग जेम्स, राहुल साळुंखे या मुंबई शहराच्या खेळाडूंनीही या स्पर्धेत सहभाग घेतला. एसएसकेके असोसिएशन व गुरुपुल पृती फाऊंडेशन ट्रस्ट यांच्याकडून मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच साहित्यही पुरवण्यात आले.