विजय केंकरे यांचे नाटय़ शतक, ‘काळी राणी’ लवकरच रंगभूमीवर

ज्येष्ठ नाटय़कर्मी, दिग्दर्शक विजय पेंकरे गेली 40 वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत. विजय पेंकरे लवकरच ‘काळी राणी’ या आपल्या नव्या नाटकासहित आपल्या नाटय़ कारकीर्दीचे शतक साजरे करणार आहेत. ‘काळी राणी’ हे त्यांचे 100 वे नाटक 11 डिसेंबरला रंगभूमीवर येतंय.

या नाटकाशी खासियत म्हणजे त्याच्याशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ यांनीही या नाटकाद्वारे आपल्या रंगमंचीय कारकीर्दीचे वेगवेगळे टप्पे गाठले आहेत. रत्नाकर मतकरी यांचे 90 वे नाटक, प्रदीप मुळय़े 200 वे नाटक, अजित परब 40 वे नाटक, शीतल तळपदे 125 वे नाटक, मंगल पेंकरे 50 वे नाटक, राजेश परब 50 वे नाटक, अक्षर शेडगे यांचे 1400 वे नाटक आणि डॉ. गिरीश ओक यांचे 51 वे नाटक. असा भन्नाट योग ‘काळी राणी’ने साधला आहे.

‘काळी राणी’मध्ये मनवा नाईक, हरीश दुधाडे, आनंद पाटील, चंद्रलेखा जोशी आणि डॉ. गिरीश ओक यांच्या भूमिका आहेत.  डॉ. गिरीश ओक यांचा 6666 वा प्रयोग या नाटकाद्वारे रंगणार आहे.