शिवसेना गटनेते विनायक राऊत ठरले प्रभावी प्रश्न विचारणारे खासदार

1442

मध्यप्रदेशमधील फेम इंडिया-एशिया पोस्टने केलेल्या सर्वेक्षणात लोकसभेत जनतेचे प्रश्न उपस्थित करणार्‍या देशातील 25 निवडक खासदारांची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून प्रभावी आणि अभ्यासपूर्ण प्रश्न मांडलेल्यांमध्ये शिवसेना गटनेते आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत तर युवा गटात भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.

लोकसभेमध्ये देशातील 543 खासदार आहेत. लोकसभेतील या खासदारांमधून फेम इंडिया-एशिया पोस्टने सर्वेक्षण करून लोकसभेत खासदार कशा पध्दतीने आपआपल्या मतदार संघातील प्रश्न मांडतात याचा अभ्यास केला. यासाठी सर्वेक्षणाचे 25 गट करण्यात आले होते. यामध्ये खासदार जनतेचे प्रश्न सभागृहात जबाबदारीने कसे मांडतात, याचे परिक्षण केले. एशिया पोस्टने आपल्या सर्वेक्षणात खासदारांची लोकप्रियता, जनतेशी संबंधित प्रश्न लोकसभेत कसे मांडतात,लोकसभेतील खासदारांची उपस्थिती, लोकसभेतील प्रश्नोत्तरात खासदारांचा सहभाग, जनतेच्या हिताचे प्रश्न कसे मांडतात, देशाच्या हिताचे प्रश्नासंबंधि खासदारांचे मत आदीचे परिक्षण केले होते. या सर्व्हेक्षणात निवड झालेल्या 25 खासदारांबाबत सर्व सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांनाही प्रश्न विचारून त्यांची मते विचारात घेण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या