अमेरिकेतही ‘पुष्पा’ची जादू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. हिंदुस्थानात किंवा परदेशात, सगळीकडे ‘पुष्पा’ची गाणी, डायलॉग जोरदार गाजत आहेत. इंस्टाग्रामवर तर डान्स रिलचा वर्षाव होत आहे. अशातच अमेरिकेतील एका ‘पुष्पा फिव्हर’चे उदाहरण नुकतंच समोर आलंय. 13 वर्षीय अमेरिकन व्हायोलिन वादक कॅरोलिना प्रोत्सेन्कोने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर ‘पुष्पा’ चित्रपटातील दोन गाणी सादर केली. या मुलीने तिच्या व्हायोलिनवर ‘ओ अंतवा ऊओ अंतवा’ हे गाणे वाजवले. त्याचा सूर ऐकून रस्त्याने चालणारे लोक अचानक थांबले आणि ते लक्षपूर्वक ऐकू लागले. कॅरोलिनाचे गाणे ऐकून लोकांनी खूप टाळय़ा वाजवल्या.