आदित्य नारायणसोबत नाचायला गेली आणि नेहा कक्कर धपकन पडली…

वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेली गायिका नेहा कक्कर आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा इंडियन आयडॉलमधला जुना व्हिडीओ वायरल झाला आहे.

नेहा कक्कडचे नुकतेच रोहनप्रित सिंग याच्यासोबत लग्न झाले. दोघांचे फोटो सोशल मिडीयावर ट्रेण्डिंग्समध्ये होते. सध्या लॉकडाऊनमुळे इंडियन आयडॉलची शुटींगही थांबवण्यात आली आहे. अशातच नेहाचा एक जुना व्हिडीओ सोशल मिडीयावर जबरदस्त वायरल होत आहे.

नेहा इंडियन आयडॉलचे गेले तीन सिझन परिक्शक म्हणून काम पाहतेय तर आदित्य होस्टची भूमिका करतोय. या दोघांमध्ये अनेकदा जुगलबंदी पाहायला मिळते आणि लोकांना ती आवडते. असाच एक व्हिडीओ सध्या वायरल होत आहे.

या व्हिडीओत नेहा कक्कड आणि इंडियन आय़डॉलचा होस्ट आदित्य नारायण याच्यासोबत दिलबर या गाण्यावर नाचत होते. त्यावेळी नेहा जशी आदित्यकडे वळते त्याचा तोल जातो आणि ती त्याच्या हातातून निसटून खाली पडते. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनी त्याच्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या