
सामना ऑनलाईन । वसई
वसई, विरार, नालासोपाऱ्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडत असून अधून मधून मुसळधार पावसासह संततधार सुरूच आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
वसई, नालासोपाऱ्यात पाणी साचले, पाहा फोटो
वसईतील आनंद नगर, समता नगर, नवघर, माणिकपूर बस आगार येथे पाणी साचले आहे. नालासोपाऱ्यातही आचोले रोड, स्टेशन परिसर, सेन्ट्रल पार्क रोड, संतोषभूवन, धानिव बाग, बिलालपाडा, पेल्हार फाटा हे परिसर जलमय झाले आहेत. विरारमधील विवा कॉलेजसमोरून जाणारा रस्ता, स्टेशनला जाणारा रस्ता, चांदनासार या परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. संततधार पावसामुळे परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

























































