
पहिले चार फलंदाज लवकर बाद झाल्यावर नंदकुमार पाटीलच्या कप्तानपदास साजेशा नाबाद 39 धावांच्या फटकेबाजीमुळे हिंदुजा हॉस्पिटलने हिरानंदानी हॉस्पिटलचे आव्हान 2 गडी राखून संपुष्टात आणले आणि आयडियल स्पोर्टस् ऍकॅडमी, शिवनेर व आयडियल ग्रुप आयोजित शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल ए डिव्हिजन टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. हिंदुजाचे कडवे आव्हान परतविण्यासाठी हिरानंदानीला अष्टपैलू रूपेश माने व धडाकेबाज फलंदाज शंकर पंडीधर यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. हिंदुजा हॉस्पिटलची ए डिव्हिजन अंतिम लढत नानावटी हॉस्पिटल विरुद्ध 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वा. शिवाजी पार्क मैदानात होईल. अष्टपैलू नंदकुमार पाटीलला सामनावीर तर शंकर पंडीधरला हिरानंदानी हॉस्पिटलचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे सीएफओ सतीश श्रॉफ, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अभय सावरकर यांच्या हस्ते देण्यात आला.


























































