‘या’ पर्यटन स्थळांना भेट द्या, उन्हाळ्याची सुट्टी आनंददायी करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवावी, असे सगळ्यांनाच वाटत असते. या सुट्ट्यांमध्ये कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत सहलीला जाणं अत्यंत आनंददायी असतं. या मोठ्या सहलीचं छान प्लॅनिंग तुम्ही करू शकता. याकरिता सर्वप्रथम पर्यटन स्थळे शोधणं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण अनेकांना देशातील पर्यटन स्थळांविषयी माहिती असेलच असे नाही. आपल्या हिंदुस्थानात अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत ज्यांना भेट देऊन सहलीचा आणि मिळालेल्या मोठ्या सुट्टीचा आनंद द्विगुणीत करू शकता. जाणून घेऊया, अशा काही पर्यटनस्थळांची माहिती

डोभी गाव
हिमाचल प्रदेशामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. जेथे उन्हाळ्याच्या दिवसांत भेट देता येते. कुल्लू जिल्ह्यातील डोभी या गावी भेट देऊन सुंदर नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेऊ शकता. कुल्लू आणि मनालीमार्गे या ठिकाणी जाता येते. तुम्ही सहज येऊ शकता. हिमालयाच्या सुंदर खोऱ्यांमध्ये पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद या ठिकाणी घेता येईल. कुटुंबियांसोबत येथे सहलीला जाण्याचा आनंद घेऊ शकता.

कामशेत
महाराष्ट्रातही अनेक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. कामशेत हे एक महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य पाहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कॅम्पिंग, रॉक क्लाइंबिंग, कयाकिंग आणि हायकिंग करू शकता.

डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज
मेघालयातील नोंगबरेह येथे बांधलेला हा 500 वर्ष पूल आहे. हा पूल झाडांच्या मुकल्यांपासून बनवलेले आहे. हा पूल पाहण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात. हा पूल खासी जमातीच्या लोकांनी बांधला होता.

लक्षद्वीप
मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत साहसी खेळांचा आनंद घ्यायचा असेल तर लक्षद्वीप या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, काईट सर्फिंग, पॅराग्लायडिंग, कॅनोइंग यासारख्या साहसी खेळांचा आनंद तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. या पर्यटन स्थळाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

सुंदरबन
सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे संरक्षित खारफुटीचे जंगल आहे. येथे अनेक वन्यजीव पाहायला मिळतील. या पर्यटन स्थळालादेखील दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

केरळ
केरळ हे देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक ठिकाण आहे. या ठिकणी समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी लाखो लोक येत असतात. पर्वत, धबधबे इत्यादींसाठी केरळ प्रसिद्ध आहे. स्नेक बोट रेस आणि हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद येथे घेता येईल.