संदेशखळीची घटना भाजपने घडवून आणली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संदेशखळीमधील घडामोडी या घडवून आणण्यात आल्या असून, ईडीसोबतच या सगळय़ाची स्क्रीप्ट भाजपने तयार केली असल्याचा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपवर केला.

संदेशखळीतील एकाही महिलेने कथित प्रकारांबद्दल एफआयआर दाखल केलेला नाही. उलट आपणच पोलिसांना यासंदर्भात स्वतःहून तपास सुरू करण्याचे निर्देश दिले होते, असे ममता म्हणाल्या.

घटनेचे संरक्षण करण्याचे आवाहन

संविधानाचा आत्मा ही त्याची प्रस्तावना आहे. देशाच्या संविधानाचा मसुदा अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आला असून त्यात लोकशाही, संघराज्य आणि धर्मनिरपेक्षता याबद्दल दक्षता घेण्यात आली आहे. त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, असे विचार त्यांनी कोलकाता येथे अन्य एका कार्यक्रमात व्यक्त केले.