
ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मस्लीमीनचे (एमआयएम) नेते व राष्ट्रीय प्रवक्ता वारिस पठाण यांच्या चेहऱ्याला काळे फासण्यात आले आहे. मध्य प्रदेशमधील खाजराना दर्गाह येथे चादर चढवायला गेले असताना हा प्रकार घडला.
वारिस पठाण हे इंदूर विमानतळावर उतरल्यानंतर तेथून सालर ए उम्मत या ट्रस्टच्या उद्घाटनासाठी गेले होते. तेथून ते खाजरान दर्गा येथे गेले. तिथे एका तरुणाने त्यांच्या तोंडाला काळे फासले.वारिस यांच्या समर्थकांना काही समजायच्या आतच तो तेथून पळून गेला.
दरम्यान वारिस पठाण यांनी तोंडाला काळे फासल्याची घटना खोटी असल्याचे सांगितले आहे. ‘माझ्या तोंडाला कुणीही काळे फासले नाही. चेहऱ्याला काळा तिट लावण्याची पद्धत आहे. त्या चाहत्याने माझ्या चेहऱ्याला तिट लावला’ असे वारिस पठाण यांनी सांगितले.
वारिस पठाण यांनी असा दावा केला असला तरी इंदूर पोलिसांनी या प्रकरणी सज्जाद खान नावाच्या तरुणाला अटक केली असल्याचे समजले. वारिस पठाण देशविरोधी वक्तव्य करत असतात त्यामुळे त्यांना काळे फासल्याचे म्हटले आहे.


























































