
सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली
मुंबई, केरळमध्ये दाखल झालेला पाऊस देशभरात दाखल झाला आहे. मान्सून सक्रिय झाल्याने 33 टक्क्यांवर गेलेली पावसाची कमतरता 21 टक्क्यांवर आली आहे. मात्र तरीही अद्याप देशात अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस झाला नसून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
केंद्रीय पाणी आयोगाने दिलेल्या आकडीवारीनुसार देशभरात 91 महत्त्वाची धरणे आहेत. त्यापैकी 62 धरणांचा पाणीसाठा 80 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड यासह उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्याचप्रमाणे सौराष्ट, मराठवाडा, विदर्भातील काही भागांतही अद्याप पावसाचा तुटवडाच आहे. तर जोधपूर, सिकर, रोहतक, चंदीगढ, उना आणि अमृतसर त्याचप्रमाणे हरियाणा, पंजाब तसचे राजस्थानमधील काही भागांत येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
























































