
सामना ऑनलाईन, धुळे
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात सध्या केवळ 55 दशलक्ष घनफूट जलसाठाच उपलब्ध असून तो जुनपर्यंत पुरेल असा अंदाज आहे. मात्र हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस उशिरा येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास धुळेकरांच्या तोंडचे पाणी पळणार असून जून अखेरपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास शहराला जून महिन्यात टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
धुळे शहराला अक्कलपाडा, डेडरगाव, नकाणे तलावांतील शिल्लक जलसाठय़ातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून राहावे लागते. हद्दवाढ झालेल्या गावांमध्येही पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यावर महापालिकेने स्थानिक स्तरावर उपाय करायला सुरुवात केली आहे. शहरात पाण्याचे स्त्र्ााsत उपलब्ध करून देण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहरातील विविध ठिकाणी हातपंप बसविण्यात आले होते. त्यामुळे पाणीटंचाईतून तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी हातपंपाची दुरुस्ती होत आहे.
डेडरगाव तलावाचा दिलासा
डेडरगाव तलावाची क्षमता 120 एमसीएफटी इतकी आहे. तलावाजवळ जलशुध्दीकरण केंद्र आहे. 5 एमएलडी एवढी जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता आहे. या तलावावरून मोहाडी, मालेगाव जलपुंभ, चक्करबर्डी, दसेरा जलपुंभ व हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला पाणीपुरवठा होतो. तर अवधानलाही तलावावरून पाणी मिळते. लळींग पुरणातील अनवर नाल्याला पावसाळ्यात पाणी आल्यावर तो भरून वाहतो. तो नाला या डेडरगाव तलावाला येऊन मिळतो. तलावाची क्षमता लहान आहे.
वेळ निश्चित नसल्याने हाल
शहरातील पाणीपुरवठय़ाचे दिवस, वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी त्या पाळल्याच जात नाहीत. पाणी सोडणाऱया कर्मचाऱयाला वाटेल तेव्हा तो पाणी सोडतो. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात.

































































