
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपमध्ये आयारामांची सुरूवात झाली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पश्चिम बंगालमध्येही आता इतर पक्षीयांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे आमदार दुलाल चंद्र बर, तृणमूल काँग्रेसचे खासदार अनुपम हाजरा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार खागेन मुर्मू यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.
Delhi: Congress MLA Dulal Chandra Bar (pic 1) and CPM MLA Khagen Murmu (pic 2) also join BJP along with TMC MP Anupam Hazra. pic.twitter.com/0Lne6Bsjzj
— ANI (@ANI) March 12, 2019
तीन पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तिन्ही पक्षांना झटका बसला आहे. त़सेच काँग्रेसचे खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष अधिरंजन चौधरी हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील ममता दीदींचा गड नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.
तृणमूलधून बडतर्फ झालेले खासदार अनुपम हाजरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. पक्षविरोधी कारयावा केल्याने त्यांना जानेवारी महिन्यात पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. यासह तृणमूल, डावे आणि काँग्रेस मधील अनेक मोठे मासे भाजपच्या गळी लागण्याची चिन्हे वर्तवण्यात येत आहे.
























































