‘धकधक गर्ल’चं डिजिटल पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या दमदार नृत्य आणि अभिनय शैलीमुळे गेली अनेक दशके बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता डिजिटल विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिची ‘द फेम गेम’ ही वेबसीरिज येत्या 25 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर भेटीला येणार आहे. यापूर्वी या सीरिजचे नाव ‘फाइंडिंग अनामिका’ असे होते. यात माधुरी अनामिका आनंद नावाच्या अभिनेत्रीची भूमिका साकारतेय. या फॅमिली ड्रामा सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन, मुस्कान जाफरी मुख्य भूमिकेत आहेत.