
महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्षांतर, पक्षफुटी आणि याला अनुसरून न्यायव्यवस्थेकडून दिला जाणारा निकाल हे मध्यवर्ती ठेवत याबाबत संविधान, कायदे, नियम काय सांगतात याचा उहापोह करणारे हे पुस्तक. राजकारणातील संवैधानिक सत्याची दिशा कोणती असावी हेच या पुस्तकातून मांडले आहे.
लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
लेखक- तुळशीदास भोईटे
प्रकाशक- ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे- 211
मूल्य- 350 रुपये
गुन्हेगारी जमात समजल्या जाणाऱया पारधी समाजाच्या वेदना, संघर्ष आणि अस्तित्वाच्या लढाईचे चित्रण करणारी ही कादंबरी. गावकुसाबाहेरच्या वंचित लोकांचे जीवन मांडणाऱया या कथानकात स्वातंत्र्याच्या व्याख्येचे नव्याने अवलोकन होते.
वकिल्या पारधी
लेखक- लक्ष्मण गायकवाड
प्रकाशक – साकेत प्रकाशन
पृष्ठे – 290
मूल्य – 350 रुपये
मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची ही चरित्रकथा. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द घडवताना कमावलेले वलय आणि आयुष्याला घडलेल्या वळणाचा लेखाजोखा पुस्तकात शब्दांकित झाला आहे. दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या आयुष्याची ही वाटचाल वाचायलाच हवी.
वर्षारंग वर्षा उसगावकर
लेखक – दिलीप ठाकूर
प्रकाशक – नीलकंठ प्रकाशन
पृष्ठे- 72
मूल्य – 600 रुपये


























































