पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील पहिल्या मंत्रिमंडळाचा आज सोमवार, 1 जून रोजी विस्तार करण्यात आला. यामध्ये 35 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आर. एन. रवी यांनी सकाळी 11 वाजता लोक भवन येथे नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

भाजप आमदार दीपक बर्मन, अर्जुन सिंग, शंकर घोष, गौरी शंकर घोष, तापस रॉय, मनोज कुमार,रुपा गांगुली, रितेश तिवारी, चंदना बाऊरी यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विस्ताराबाबत माहिती दिली होती. ते म्हणालेले, “पश्चिम बंगालमधील जनतेने निवडून दिलेल्या या सरकारचे एक परिपूर्ण मंत्रिमंडळ आकारास येईल.”