
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी हिंदुस्थानच्या वरिष्ठ खेळाडूंच्या संघाची आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या अ संघाची घोषणा बीसीसीआयने केली. या दोन्ही संघांमध्ये शेल्डन जॅक्सन आणि मनदीप सिंग या दोघांची निवड न झाल्याने हिंदुस्थानचा फिरकीपटू हरभजन सिंग नाराज झाला आहे. संघात निवड होण्यासाठी धावा काढण्याबरोबर आणखी काय करायला हवे असा सवाल त्याने निवड समितीला विचारला आहे.
गेल्या दोन रणजी मोसमामध्ये सौराष्ट्राकडून खेळताना शेल्डन जॅक्शन याने दमदार कामगिरी केली आहे. असे असतानाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हिंदुस्थानच्या अ संघात त्याला स्थान देण्यात आले नाही. तसेच पंजाबचा खेळाडू मनदीप सिंग याचीही निवड झाली नाही. यावर नाराजी व्यक्त करताना हरभजन सिंग याने दोन वेगवेगळे ट्वीट करत निवड समितीवर ताशेरे ओढले.
शेल्डन जॅक्शनच्या समर्थनार्थ ट्वीट करताना भज्जी म्हणाला की, 2018-19 च्या रणजी मोसमात 854 आणि 2019-20 च्या मोसमात शेल्डनने 809 धावा केल्या. मात्र तेव्हा आणि आताही त्याची हिंदुस्थानच्या अ संघात निवड झाली नाही. निवड समितीने धावा काढण्यासोबत हिंदुस्थानकडून खेळण्यासाठी आणखी काय करण्याची आवश्यकता आहे, हे स्पष्ट करावे, असे म्हणत भज्जीने #शर्मनाक हा हॅशटॅगही वापरला.
Ranji season 2018/19 scored 854 and 2019/2020 scored 809 and also Ranji champion that year plus this year current form👇yet not getting picked even for India A team.can 🇮🇳selector tell him what else he need to do to ply for india apart from scoring runs #shame @ShelJackson27 pic.twitter.com/HcwQDwhGsZ
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 9, 2021
तसेच निवड समितीनच्या सदस्यांना देशांतर्गत क्रिकेट पाहावे असेही भज्जी म्हणाला. मनदीप सिंग याच्या रणजी स्पर्धेतील आकडेवारीचे स्क्रीनशॉटही भज्जीने शेअर केले. आणखी एका चांगल्या खेळाडूला दमदार खेळ करूनही संधी मिळाली नाही. टीम इंडियाच नाही तर हिंदुस्थानच्या अ संघातही स्थान मिळाले नाही. त्यामुळे निवड समितीने देशांतर्गत क्रिकेटही पहावे, अन्यथा रणजी मोसम खेळवण्याचा फायदाच काय? असेही भज्जी म्हणाला.
Another top player not getting his dues @mandeeps12 forget team India not even in India A.selectors need to see some domestic matches records or else what’s th point having Ranji seasons.check his stats 👇last domestic season played.due to corona no cricket in 20/21 #shocking pic.twitter.com/UotDWxux11
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) November 9, 2021




























































