ओवा आणि कापूर हुंगल्याने ऑक्सिजन पातळी वाढते ?

व्हॉटसअपचा वापर हा गेल्या काही वर्षात माहिती मिळवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. काही दिवसांपासून व्हॉटसअवर एक मेसेज फिरतो आहे. ओवा आणि कापूर हुंगल्यास शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण देशात वाढलं असून बऱ्याच कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. आपल्यावर ही वेळ येऊ नये यासाठी व्हॉटसअपवर आलेल्या या संदेशानुसार बहुसंख्य लोकांनी ओवा आणि कापूर हुंगायला सुरुवात केली आहे. मात्र प्रश्न हा आहे की ओवा आणि कापूर हुंगल्याने खरोखर ऑक्सिजनची पातळी वाढते का ?

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी रिचवला 36 कोटी लिटर आयुर्वेदीक काढा

व्हॉटसअपवर फिरत असलेल्या संदेशात म्हटलंय की ‘कापूर, लवंग, ओवा आणि निलगिरीच्या तेलाचे काही थेंब असं एकत्र करून एक पुरचुंडी तयार करावी. ही पुरचुंडी दिवभर हुंगत राहावी, यामुळे शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढते. ही पुरचुंडी लडाखला फिरायला जाणाऱ्यांना दिली जाते, कारण तिथे ऑक्सिजनची पातळी कमी असते.’

या दाव्याची जेव्हा पतडताळणी करण्यास सुरुवात झाली तेव्हा तज्ज्ञांनी सांगितलं की या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाहीये. छातीविकारतज्ज्ञांनी तर हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं आहे. कान नाक घसा तज्ज्ञ डॉ आर.के.खन्ना यांनी म्हटलंय की कोरोनामुळे वास गेला नाहीये ना हे तपासण्यासाठी कापूर हुंगला तर काही हरकत नाही, मात्र तो वर नमूद केलेल्या इतर घटकांसोबत एकत्र करून मास्कमध्ये ठेवला तर त्याचा अपायही होऊ शकतो.

घरात एकटे राहात असाल आणि कोरोना झाला तर काय कराल ? वाचा ‘प्लान B’

पुरचुंडी हुंगण्याच्या या मेसेजव्यतिरिक्त व्हॉटसअपवर काही प्रिस्कीप्शनही व्हायरल झाली आहेत. या प्रिस्क्रीप्शनमध्ये घरगुती उपायांपासून युनानी, आयुर्वेदाच्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचाही समावेश आहे. याशिवाय कोरोनाला दूर ठेवण्यासाठी अमुक अमुक औषधे घ्या असे सांगणारे व्हिडीओ आणि ऑडियो क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. या कशावरही विश्वास ठेवू नये असं डॉक्टरांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. असल्याच एका उपायामध्ये 5 चमचे दालचिनी पावडर गरम पाण्यासोबत घ्यावी असा सल्ला देण्यात आला होता. दालचिनीमुळे शरीरातील कार्बन डाय ऑक्साईड वाढतो असं डॉ.नरोत्तम कुमार यांनी म्हटले आहे. हा वायू वाढल्याने शरीरातील रक्तप्रवाहाला अडथळे निर्माण होतात असे कुमार यांनी सांगितले आहे. दर दोन तासांनी काढे पिण्याचा सल्लाही शरीराला अपायकारक ठरू शकतो असंही कुमार यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या