WHO चे प्रमुख सेल्फ क्वारंटाईन, कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने घेतला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अदनोम घेबियस (tedros adhanom ghebreyesus) हे सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

टेड्रोस अदनोम यांची प्रकृती उत्तम असून त्यांना कोणतेही लक्षणे दिसून आलेली नाहीत. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे लक्षात आल्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे मी सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. माझी तब्येत उत्तम आहे. तसेच माझ्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. मात्र नियमानुसार क्वारंटाईन होऊन घरून काम करणार आहे, असे ते म्हणतात.

फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलियात पुन्हा लॉकडाऊन

दरम्यान, कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याचा धोका पाहता फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. ब्रिटनमधील लॉकडाऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागू असेल असे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी म्हंटले. तर ऑस्ट्रेलियामध्ये देखील 4 आठवड्याचे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.