पत्नीने पतीला पोटगी देण्याचा न्यायालयाचा आगळा निकाल

उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक न्यायालयाने एका प्रकरणामध्ये पत्नीने पतीला निर्वाह भत्त्याची रक्कम म्हणून महिना 2 हजार रुपये द्यावेत असे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण-

न्यायालयाने पतीला निर्वाह भत्ता (पोटगी) देण्याचे आदेश महिलेला दिले असले तरी तिचा पती या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नाहीय. आपल्याला पत्नीच्या पेन्शनच्या रकमेपैकी एक तृतीयांश हिस्सा देण्यात यावा, अशी मागणी पतीने केली आहे.

खतौली तहसील क्षेत्रात राहणाऱया किशोरीलाल सोहंकार यांचे 30 वर्षांपूर्वी कानपूरमधील मुन्नी देवी यांच्याशी लग्न झाले होते. दहा वर्षे किशोरीलाल आणि मुन्नी देवी वेगवेगळे राहत होते. आता उपजीविकेसाठी कर्ज काढून राहावे लागत असल्याने पत्नीच्या पेन्शनमधून आपल्याला पोटगी मिळावी अशी किशोरीलालची मागणी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या