धक्कादायक….आजारी भावाला किडनी दान केली; संतापलेल्या पतीने व्हॉट्सॲपवर दिला तलाक…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
triple-talaq

कर भला तो हो भला…अशी म्हण आहे. मात्र, एका महिलेने तिच्या आजारी भावाला किडणी दान केली. मात्र, ही माहिती मिळताच तिचा पती संतापला आणि त्याने व्हॉटस्अॅपवरच पत्नीला तलाक दिला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

एका महिलेने तिच्या आजारी भावाला वाचवण्यासाठी किडनी दान केली. ही माहिती तिच्या सौदी अरेबियामध्ये राहणाऱ्या पतीला समजली. त्यामुळे तो संतपाला आणि व्हॉट्सॲपवरच तिला तिहेरी तलाक दिला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेशमधील बैरियाही येथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिलेचा पती कामानिमीत्त सौदी अरेबियामध्ये गेला आहे. आजारी असलेल्या तिच्या भावाला किडनीची गरज असल्यामुळे महिलेने भावाला किडनी दान केली होती. सौदी अरेबियामध्ये असलेल्या पतीला पत्नीने भावाला किडनी दान केल्याची माहिती पत्नीने कळवली होती. पण, पतीला पत्नीचा निर्णय आवडला नाही. त्यामुळे तो संतापला आणि त्याने पत्नीला व्हॉट्सॲपवर तिहेरी तलाक दिला.

पत्नीला तिहेरी तलाकचा मेसेज येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘तिहेरी तलाक’ प्रथेला बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवले आहे. तसेच असे करणाऱ्यांविरोधात कायदाही करण्यात आला आहे.

तिहेरी तलाक किंवा तलाक-ए-बिहाद्द ही मुस्लिम समुदायांमधील एक प्रथा आहे. या प्रथेनूसार पत्नीच्या संमंतीशिवाय तीन वेळा तलाक उच्चारून मेसेज, इमेल किंवा कोणत्याही स्वरुपात पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार पतीला आहे. पण, 1 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने तिहेरी तलाक रद्द केला आणि मुस्लिम पुरुषांनी त्यांच्या पत्नींना ‘झटपट तलाक’ देणे हा फौजदारी गुन्हा म्हणुन वर्गिकृत केला आहे. त्यामुळे जर एखाद्या मुस्लिम पुरुषाने तिहेरी तलाक पध्दतीने घटस्फोट दिला तर त्या व्यक्तीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अशा व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक केली जाऊ शकते आणि जामीन केवळ दंडाधिकाऱ्याच्या विवेकबुद्धीनुसार दिला जातो. त्यामुळे या प्रकरणी आता काय कारवाई होणार, याची चर्चा होत आहे.