सत्तेत आल्यास राजद्रोहाचा कायदा हटवू, काँग्रेसचे जाहीरनाम्यात वचन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभेत काँग्रेसला सत्ता मिळाली तर ब्रिटिशांच्या काळातील राजद्रोहाचा कायदा हटवू असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. मतदनाची तारीख जस जशी जवळ येत आहे, तसे राजकीय पक्षांनी आपेल जाहीरनामे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना किमान वेतनाची न्याय योजना, कायद्यात सुधारणा, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असे अनेक मुद्द्यांच्या समावेश केला आहे. या जाहीरनाम्यात राजद्रोह कायदा हटवणे, अफस्पा आणि अब्रुनुकसानी कायद्यात सुधारणा करणे ही महत्त्वाची बाब आहे.

ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेला राजद्रोहाचा कायदा 124(A) याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हा कायदा कालबाह्य झाला असून तो रद्द केला जाईल असे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच सशस्त्र दलाचा अफस्पा कायद्यात सुधारणा करून सुरक्षा दल आणि नागरिकांमध्ये सामंजस्य घडवले जाईल तसेच, अब्रुनुकसानीचे 499 कलम यात बदल करून तो फौजदारीच्या ऐवजी दिवाणी गुन्हा म्हणून नोंदवला जाईल असे काँग्रेसने आपल्या वचननाम्यात म्हटले आहे.