
अमेरीकेत एक विचित्र घटना घडली आहे.अमेरिकेतील एका एअरलाईन कंपनीच्या चूकीमुळे एक महिला प्रवासी विदेशात पोहोचली आहे. आश्चर्य म्हणजे जेव्हा ही महिला विमानतळावर पोहोचली त्यावेळी तिच्याकडे पासपोर्टही नव्हता. एअरलाईन्सने चूकून डोमेस्टीक प्रवाशाला इंटरनॅशनल लोकेशनवर पाठवले. एअरलाईन्सला त्यांची चूक कळल्यावर त्यांनी महिला प्रवाशाची माफी मागितली आहे.
एबीसी न्यूजनुसार, एलिस हेबर्ड असे त्या महिलेचे नाव असून तिने अमेरीका एअरलाईन्स कंपनीच्या फ्रंटियरने उड्डाण केले होते. त्यांनी न्यू जर्सीतू्न फ्लोरिडासाठी तिकीट काढले होते. मात्र त्यांच्या भोंगळ कारभारामुळे ती महिला दुसऱ्या विमानात बसली आणि कॅरेबियन कंट्री जमैकामध्ये पोहोचली. जेव्हा एलिस विदेशी विमानतळावर उतरली आणि तिची तपासणी करण्यात आल्याने सुरक्षा रक्षक आश्चर्यचकित झाले. कारण एलिसजवळ पासपोर्ट नव्हता. नंतर कळले की, ती चुकून दुसऱ्या विमानात बसून इथे बसली होती. तपासात एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते.
एलिसने सांगितले की, ती कायम विमानाने प्रवास करत असते. त्या दिवशीही विमानात बसण्यासाठी गेटवर पोहोचले. ज्यामध्ये ‘PHL To JAX’ लिहीले होते. मात्र विमानात बसण्यापूर्वी बाथरूमला गेले. पण परतताना बोर्डिग पास तपासणाऱ्या व्यक्तीने गडबडीत मला दुसऱ्या फ्लाईमध्ये बसवले. एलिसने दावा केला की, एंट्री गेट बदलल्यामुळे फ्लोरिडाच्या जॅक्सनविले पोहोचण्याऐवजी जमैका पोहोचले. एलिस पाठिच्या शस्त्रक्रिया झाल्याने एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने मला सीटवर बसवले. घाईघाईत त्याने बोर्डिंग पास तपासला. टेकऑफ केल्यानंतर कळले की मी चुकीच्या विमानात बसले आहे. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर फ्लाइट अटेंडंटच्या मदतीने जमैकाच्या एअरपोर्टवर उतरली आणि तिथून दुसरे विमान पकडून अमेरीकेला आली.
याप्रकरणी फ्रंटियर एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही या घटनेप्रकरणी खेद व्यक्त करत आहोेत आणि ग्राहकाची माफी मागतोय. आम्ही त्यांनी तिकीटीचे पैसे परत करणार आणि त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच जमैकाच्या विमानतळाबाबतही हे प्रकरण सोडवण्यात आले आहे.

























































