वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार, जालना जिल्ह्यातील जामखेड येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथील शेतकरी महिला सुभद्राबाई पंढरीनाथ म्हस्के (50) गावा शेजारील आपल्या शेतात 7 नोव्हेंबर रोजी सकाळी एकटी कापूस वाचण्यासाठी गेली असता दिवसभर त्या शेतात एकट्याच होत्या.

त्या सायंकाळपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी व गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेतीकडे धाव घेतली असता त्यांचा मुतदेह लचके तोडलेल्या अवस्थेत आढळून आला.

तेथील लोकांना ही माहिती पोलिसांना दिली असता घटनास्थळी डॉ. कुटे येऊन मुतदेह ताब्यात घेऊन अंबड येथील रुग्णालयात पाठवून दिला.

 या घटनेनंतर गाव व परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुभद्राबाई पंढरीनाथ म्हस्के यांच्या पच्यात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या वन्य प्रान्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.