
बाळाला विकून पैसे कमवायचे या लालसेने एका महिलेने तिच्या गरोदर मैत्रिणीचे पोट फाडून त्यातील बाळ पळवले आहे. कोलंबिया देशात गेल्या वर्षी ही घटना घडली असून आता त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मारिलुझ मोसक्वेरा (49) असे त्या महिलेचे नाव असून तिने सप्टेंबर 2020 मध्ये हा भयंकर प्रकार केला होता.
28 वर्षीय युलेक्सिस वॅलेसिलोस असे त्या गरोदर महिलेचे नाव असून तिची मारिलुझ मोसक्वेरा सोबत ओळख झाली होती. मोसक्वेराने सुरुवातीला तिच्या होणाऱ्या बाळासाठी काही खेळणी व गिफ्ट्स दिले होते. त्यानंतर बाळाच्या भविष्यासाठी आर्थिक मदत करेन असे देखील तिने युलेक्सिसला सांगितले होते.
8 सप्टेंबर 2020 ला मोसक्वेराने युलेक्सिसला तिच्या घरी बोलावले. त्यावेळी तिला नववा महिना सुरू होता. त्यानंतर मोसक्वेरा व तिच्या पतीने मिळून युलेक्सिसची हत्या केली व तिचे पोट फाडून त्यातील बाळ काढले. त्यानंतर ती बाळाला घेऊन पळून गेली. तर तिच्या पतीने युलेक्सिससचा मृतदेह एका जंगलात खड्ड्यात पुरला.




























































